|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » बाबुल सुप्रियो यांच्या गाडीच्या काचा फोडल्या

बाबुल सुप्रियो यांच्या गाडीच्या काचा फोडल्या 

 ऑनलाईन टीम / कोलकाता :

पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघात ईव्हीएम मशीनमध्ये गडबड झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. एकमेकांना भिडलेल्या प्रक्षुब्ध जमावाने केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार केला.

आसनसोल लोकसभा मतदारसंघातील पांडाबेश्वर विधानसभा मतदारसंघातही ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यानी मतदान केंद्राबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. हा प्रकार समजल्यानंतर केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, जमावाने सुप्रियो यांच्या दिशेने दगडफेक केली. त्यामध्ये बाबुल सुप्रियो त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या.