|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » leadingnews » देशात चौथ्या टप्प्यातील मतदान संपन्न

देशात चौथ्या टप्प्यातील मतदान संपन्न 

ऑनलाईन टीम / मुंबई :

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान संपन्न झाले आहे. आज देशातील नऊ राज्यांतील 72 जागांवर मतदान पार पडले आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत देशभरात 50.60 टक्के तर राज्यात 52.07 टक्के मतदान झाले. देशात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 76.47 टक्के मतदान नोंदविण्यात आले आहे.  महाराष्ट्रात 17, राजस्थान आणि उत्तरप्रदेशात प्रत्येकी 13, पश्चिम बंगालमध्ये 8, मध्यप्रदेश व ओडिसात प्रत्येकी 6, बिहारमध्ये 5, झारखंड 3, जम्मू-कश्मीरमधील अनंतनाग मतदारसंघात मतदान होत आहे. अनंतनागमध्ये तीन टप्प्यात मतदान होत आहे. पहिल्या तीन टप्प्यात 302 जागांवर मतदान झाले आहे. आता शेवटच्या तीन टप्प्यांत 168 जागांवर मतदान होईल. चौथ्या टप्प्यात 961 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद होणार आहे. या टप्प्यात 12.79 कोटी मतदार आहेत.

देशातील अनेक राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत झालेले मतदान पुढीलप्रमाणे :

बिहार 53.67 टक्के, मध्यप्रदेश 65.86 टक्के, महाराष्ट्र 51.06 टक्के, ओडिसा 64.05, राजस्थान 62.86, उत्तर प्रदेश 53.12, पश्चिम बंगाल 76.47, झारखंड 63.40 टक्के

मुंबई दक्षिण मध्य – 51.53, मुंबई दक्षिण – 48.23, उत्तर मुंबई – 54.72, उत्तर पश्चिम – 50.44, उत्तर पुर्व – 52.30, उत्तर मध्य – 49.49, भिवंडी – 48.90, कल्याण – 41.64, ठाणे – 46.42, पालघर – 57.60, नंदुरबार – 62.44, मावळ – 52.74, धुळे – 50.97, शिर्डी – 56.19, शिरुर – 52.45, नाशिक – 53.09, दिंडोरी – 58.20

Related posts: