|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » शिक्षणातील गुंतवणुकीतूनच कुशल मनुष्यबळनिर्मिती

शिक्षणातील गुंतवणुकीतूनच कुशल मनुष्यबळनिर्मिती 

डॉ. रघुनाथ शेवगावकर यांचे मत

पुणे / प्रतिनिधी :

शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक वाढली, तर गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासह कुशल मनुष्यबळाची निर्मिती होईल, अशी अपेक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. रघुनाथ शेवगावकर यांनी येथे व्यक्त केले.

वाघोली येथील रायसोनी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित ‘जीएचआर कनेक्ट’ या एकदिवसीय परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. पुणे स्टेशनजवळील हॉटेल शेरेटॉन ग्रँड येथे पार पडलेल्या ‘एंगेजिंग विथ मिलेनियल्स’ या संकल्पनेवर आधारित या परिषदेला टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (टीसीएस) उपाध्यक्ष दिनानाथ खोळकर, रायसोनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त संचालक अजित टाटिया, नागेंद्र सिंग, डॉ. के. के. पालिकाल, प्राचार्य डॉ. आर. डा.r खराडकर, डॉ. प्रीती बजाज, आदित्य भंडारी आदी उपस्थित होते.

डॉ. शेवगावकर म्हणाले, ‘शिक्षण आणि उद्योग’ ही क्षेत्रे एकमेकांवर अवलंबून आहेत. दोन्ही क्षेत्रातील लोकांनी एकमेकांच्या गरजा ओळखून समन्वय साधायला हवा. कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी उद्योजकांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी औद्योगिक सामाजिक बांधिलकीचा (सीएसआर) निधी शिक्षण क्षेत्रात अधिक गुंतवला पाहिजे.