|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » Top News » घरचे भेदी कोण, हे वेळीच ओळखा

घरचे भेदी कोण, हे वेळीच ओळखा 

 

 ऑनलाईन टीम / पुणे :  आपल्याच देशातील विद्यार्थी ’भारत तेरे टुकडे होंगे,’ असे म्हणत आहेत. ही मानसिकता घातक आहे. देशविघातक शक्तींना देशातून पाठिंबा मिळत आहे. पुलवामा हल्ला किंवा श्रीलंकेवरील हल्ला हे त्याचेच उदाहरण आहे. भारताच्या अंतर्गत सुरक्षेला सर्वांत मोठा धोका हा स्वकीयांकडूनच आहे. आपलाच आपल्यावर विश्वास उरलेला नाही. त्यामुळे अंतर्गत सुरक्षेसाठी हे घरचे भेदी कोण, हे वेळीच ओळखणे आवश्यक आहे,’ असे मत लेफ्टनंट जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर (नि.) यांनी रविवारी व्यक्त केले.

वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेत बाजीराव पेशवे स्मृती व्याख्यानानिमित्त ‘एकविसाव्या शतकातील भारतातील संरक्षणसिद्धता’ या विषयावर सिक्कीम केंद्रीय विद्यापीठाचे कुलपती असलेल्या ले. जनरल शेकटकर यांनी विचार मांडले. पेशव्यांचे वंशज पुष्कर पेशवे यांनी त्यांचे स्वागत केले.

आपल्या राष्ट्रातील लोकांची नियत बदलत चालली आहे. नियत बदलल्याने ते राष्ट्रविरोधी काम करण्यास सहज प्रवृत्त होत आहेत. माओवादी, दहशतवादी, नक्षलवादी, जैश ए महंमद या सर्व बाहेरच्या देशातील संघटना आहेत. परंतु, यांना मदत करणारे आपलेच नागरिक आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. आपलाच आपल्या व्यक्तींवर विश्वास नाही ही आपल्या सुरक्षिततेमधील सर्वांत मोठी त्रुटी आहे. त्याचाच गैरफायदा बाह्य शक्ती घेत आहेत. धार्मिक कट्टरतावादाच्या आधारावर तरुणांची माथी भडकावून त्यांना आपल्याच देशाच्या विरोधात लढण्यासाठी चिथावणी दिली जात आहे. फुटीरतावाद्यांमुळे स्थानिक युवकांची मानसिकता बिघडत चालली आहे. त्यातील धोके ओळखणे गरजेचे आहे,’ असे शेकटकर म्हणाले.

 

Related posts: