|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » म्हापशात सराफी दुकानाला आग

म्हापशात सराफी दुकानाला आग 

प्रतिनिधी/ म्हापसा

म्हापसा बाजारपेठेत असलेल्या अलंकार ज्वेलर्स या सराफी दुकानाला आग लागली. सदर दुकान बंद अवस्थेत होते. म्हापसा अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन 20 लाखांची मालमत्ता वाचविण्यात यश मिळविले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या आगीत सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती यावेळी सुत्रांनी दिली.

सदर आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा दलाचा अंदाज आहे. दुकान बंद असल्याने दुपारी 2 वा. दरम्यान आगीचे धूर बाहेर येऊ लागल्याने त्वरित अग्निशामक दलास बोलावण्यात आले. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

म्हापसा अग्निशामक दलाचे जवान शिवाजी नाईक, सुरज शेटगावकर, जयेश कानोळकर, भववान पाळणी, विष्णू केसरकर, प्रवीण पिसुर्लेकर, वासुदेव ताटे यांनी ही आग आटोक्यात आणली.

 

Related posts: