|Thursday, September 19, 2019
You are here: Home » Top News » अभिनेत्याकडून खंडणी उकळल्याप्रकरणी एका मराठी अभिनेत्रीला बेडय़ा

अभिनेत्याकडून खंडणी उकळल्याप्रकरणी एका मराठी अभिनेत्रीला बेडय़ा 

ऑनलाईन टीम / पुणे :

अभिनेता सुभाष यादवकडून खंडणी उकळल्याप्रकरणी एका मराठी चित्रपट अभिनेत्रीला लातूरमध्ये बेडय़ा ठोकण्यात आल्या आहेत. पुणे गुन्हे शाखेने शनिवारी ही कारवाई केली आहे. संबंधित चित्रपट अभिनेत्री ही आपली सहअभिनेत्री आणि दहशतवाद विरोधी पथकामधील उपनिरीक्षकाच्या साथीने खंडणीखोरी करत असल्याचा आरोप आहे.

सुभाष यादवने गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्रीने गेल्या वर्षी केला होता. त्यानंतर पुण्यातील वानवडी पोलिसांनी सुभाषला बेडय़ाही ठोकल्या होत्या. हे प्रकरण मिटवण्यासाठी तिने सुभाष यादवकडे खंडणी मागितल्याचा आरोप आहे.

दहशतवाद विरोधी पथकातील उपनिरीक्षक अमित टेकाळे अभिनेत्रीला मदत करत असल्याची माहिती पुणे क्राईम ब्रांचला मिळाली. त्यानंतर टेकाळेला अटक करण्यासाठी पुणे क्राईम ब्रांचचे पथक लातूरला गेले, मात्र त्याने त्याने तेथून पोबारा केला. त्याठिकाणी पोलिसांना आरोपी अभिनेत्रीचा ठावठिकाणा लागला. तिला अटक करुन पोलिस पुण्याला आले, तर टेकाळेला निलंबित करण्यात आले आहे.