|Saturday, February 29, 2020
You are here: Home » Top News » शहीद हेमंत करकरेंच्या कामाबद्दल शंका :  सुमित्रा महाजन

शहीद हेमंत करकरेंच्या कामाबद्दल शंका :  सुमित्रा महाजन 

ऑनलाईन टीम / भोपाळ :

भोपाळ लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी मुंबईचे एटीएस प्रमुख शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनीही करकरेंविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन वाद ओढवून घेतला आहे. करकरे यांनी दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून केलेल्या कामाबद्दल सुमित्रा महाजन यांनी शंका उपस्थित केली आहे.

महाजन यांच्या या विधानातून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर निशाणा साधल्याचं बोललं जात आहे. महाजन यांच्या विधानाला सिंह यांनी प्रत्युत्तर दिले. ‘सुप्रिया ताई, तुम्ही अशोक चक्र विजेत्या हेमंत करकरेंसोबत माझे नाव जोडत आहात, याचा मला अभिमान वाटतो,’ अशी प्रतिक्रिया दिग्वजिय सिंह यांनी दिली.

Related posts: