|Monday, June 24, 2019
You are here: Home » Top News » ऋषी कपूर आता कॅन्सरमुक्त

ऋषी कपूर आता कॅन्सरमुक्त 

 

 ऑनलाईन टीम / मुंबई :  ऋषी कपूर (चिंटू) आता कॅन्सरमुक्त आहे. राहुल रावेल यांनी दिलेल्या या माहितीनंतर ऋषी कपूर यांच्या चाहत्यांनी त्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. फेसबुकवर ऋषी कपूर यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

ज्ये÷ अभिनेते ऋषी कपूर गेल्या काही महिन्यांपासून न्यूयॉर्कमध्ये आहेत. न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांचे कुटुंबीय प्रकृतीची माहिती सतत सोशल मीडियावर देत असतात. ऋषी कपूर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आजपर्यंत त्यांना नक्की कोणता आजार आहे हे स्पष्टपणे सांगितलं नव्हतं, पण त्यांना कॅन्सर असल्याची जोरदार चर्चा होती. अशातच आता दिग्दर्शक आणि ऋषी कपूर यांचे मित्र राहुल रावेल यांनी मोठा खुलासा केला आहे.