|Saturday, February 22, 2020
You are here: Home » Top News » नेस वाडियाला दोन वर्ष तुरुंगवास

नेस वाडियाला दोन वर्ष तुरुंगवास 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध उद्योजक नसली वाडिया यांचा पुत्र आणि अभिनेत्री प्रीती झिंटाचा एक्स बॉयप्रेंड नेस वाडिया याला अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी जपानमधील सपोरो कोर्टाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

नेस वाडिया आयपीएलच्या किंग्स इलेव्हन पंजाब क्रिकेट संघाचा सहमालक आहे. त्याची ही शिक्षा 5 वर्षांसाठी निलंबित ठेवण्यात आली असून, पुढील 5 वर्षांच्या काळात नेस याने गुन्हा केल्यास त्याला तुरंगवास होणार आहे. वाडियाला उत्तर जपानमधील होक्काइदो विमानतळावर न्यू चितोसे विमानतळावर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडयात अटक करण्यात आली. त्या वेळी त्याच्याकडे 25 ग्राम कॅनाबीस रेझिन आढळले होते.

Related posts: