|Thursday, February 27, 2020
You are here: Home » क्रिडा » आशियाई महिला टेनिस स्पर्धेत स्निग्धा, सरावाणी, प्रियम, श्रीनिधी यांचा मुख्यफेरीत प्रवेश

आशियाई महिला टेनिस स्पर्धेत स्निग्धा, सरावाणी, प्रियम, श्रीनिधी यांचा मुख्यफेरीत प्रवेश 

 पुणे / प्रतिनिधी :

नवनाथ शेटे स्पोर्टस् अकादमी यांच्यावतीने एमएसएलटीए यांच्या सहकार्याने आयोजित व आशियाई टेनिस संघटना व अखिल भारतीय टेनिस संघटना, पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पहिल्यावहिल्या 3000 डॉलर पारितोषिक रकमेच्या फिनआयक्मयू एटीटी आशियाई मानांकन महिला टेनिस स्पर्धेत स्निग्धा बाला आगम, सरावाणी चिंतलापल्ली, प्रियम कुमारी, श्रीनिधी श्रीधर या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत स्नग्धा बाला आगम हिने आलयका इब्राहिमचा 6-1, 6-2 असा सहज पराभव करून मुख्य फेरी गाठली. चुरशीच्या झालेल्या लढतीत सरावाणी चिंतलापल्लीने रूपकथा मुखर्जीचा टायब्रेकमध्ये 7-6(6), 2-6, 6-3 असा पराभव करून आगेकूच केली. हा सामना तीन तास चालला. प्रियम कुमारी हिने प्रगती सोलणकरवर 6-4, 6-1 असा विजय मिळवला. श्रीनिधी श्रीधरने प्रगती नारायणनचा 6-2, 6-1 असा पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली.

स्पर्धेत मुख्य फेरीसाठी वैदेही चौधरी, युब्रानी बॅनर्जी, आलिया इब्राहिम आणि बेला ताम्हणकर यांना वाईल्ड कार्ड प्रदान करण्यात आले असल्याचे स्पर्धेचे संचालक नवनाथ शेटे यांनी सांगितले.

स्पर्धेचा सविस्तर निकालः अंतिम पात्रता फेरीः

स्निग्धा बाला आगम(भारत)वि.वि.आलयका इब्राहिम(भारत) 6-1, 6-2; 

प्रियम कुमारी(भारत)वि.वि.प्रगती सोलणकर(भारत) 6-4, 6-1;

सरावाणी चिंतलापल्ली(भारत)वि.वि.रूपकथा मुखर्जी(भारत)7-6(6), 2-6,6-3;

श्रीनिधी श्रीधर(भारत)वि.वि.प्रगती नारायणन(भारत)6-2, 6-1.     

 

Related posts: