|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » leadingnews » घरघुती गॅसच्या किंमतीत पुन्हा वाढ, सामान्यांच्या खिशाला बसणार झळ

घरघुती गॅसच्या किंमतीत पुन्हा वाढ, सामान्यांच्या खिशाला बसणार झळ 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

लोकसभा निवडणुका सुरू असतानाच सामान्य व्यक्तीच्या खिशाला सरकारने पुन्हा एकदा जोराचा धक्का दिला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किंमतीत भरमसाट वाढ केली आहे. यामुळे सामान्य जनतेच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे. घरगुती एलपीजी सबसिडी असलेल्या सिलेंडर गॅसची किंमत 6 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. तर सबसिडी नसलेल्या सिलेंरच्या किमतीत 22.5 रुपयांची वाढ झाली आहे. या किमती 1 मेपासून म्हणजे आजपासून लागू होणार आहेत. घरगुती गॅसच्या वाढलेल्या किमतीनंतर दिल्लीतल्या रहिवाशांना सबसिडीच्या सिलेंडरसाठी 502 रुपये मोजावे लागणार आहेत. तर सबसिडी नसलेल्या सिलेंडरसाठी 730हून अधिक रुपये मोजावे लागणार आहेत. 1 एप्रिललाही सिलेंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या.