|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » श्रीलंकेप्रमाणे भारतात देखील पंतप्रधानांनी बुरखा आणि नकाब बंदी करावी : सेनेची मागणी

श्रीलंकेप्रमाणे भारतात देखील पंतप्रधानांनी बुरखा आणि नकाब बंदी करावी : सेनेची मागणी 

ऑनलाईन टीम / मुंबई :    

श्रीलंकेतील साखळी स्फोटानंतर राष्ट्रपती मैत्रीपाल यांनी बुरखा बंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाचा आधार घेत शिवसेनेने सामना अग्रलेखातून श्रीलंकेप्रमाणेच भारतातही बुरखा आणि नकाब बंदी घालण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. मोदी आज अयोध्या दौऱयावर असल्याने रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? असा सवालही पंतप्रधानांना करण्यात आला आहे.

श्रीलंकेतभीषण बॉम्बस्फोट झाले त्याचे हादरे भारताला देखील बसले आहेत. शेजारधर्म तर आहेच, पण लंकेशी आपले धर्मिक आणि भावनिक संबंधदेखील आहेत. सरकारी आकडा काहीही असला तरी कोलंबोतील बॉम्बस्फोट मालिकेत पाचशेहून अधिक निरपराध्यांचा बळी गेला आहे. लिट्टेच्या दहशतवादातून मुक्त झालेला हा देश आता इस्लामी दहशतवादाचा बळी ठरला आहे.

जम्मू-कश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. तो इस्लामी दहशतवादाने त्रस्त आणि जर्जर झाला आहे. त्यामुळे प्रश्न इतकाच आहे, श्रीलंका, फ्रान्स, न्यूझीलंड आणि ब्रिटनसारखी राष्ट्रे जी कठोर पावले उचलतात तशी पावले भारत कधी उचलणार? विद्यमान सरकारने ट्रिपला तलाक विरोधी कायदा करून पीडित मुस्लिम महिलांचे शोषण वगैरे थांबवले हे मान्य, पण भीषण बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेत बुरखा आणि नकाबसह चेहरा झाकणाऱया प्रत्येक गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला असल्याचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी हे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. परंतू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात देखील बुरखा तसेच नकाब बंदी करावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

बुरखा, नकाब बंदीला आठवलेंचा विरोध

दरम्यान, बुरखा, नकाबवर बंदी शिवसेनेच्या भूमिकेला रिपब्लकिन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी याला विरोध केला आहे. बुरखा परिधन करणारी प्रत्येक महिला दहशतवादी नसते, असं आठवलेंनी म्हटले आहे. त्यामुळे बुरख्यावरुन महायुतीतली मतमतांतरे समोर आली आहेत.  

Related posts: