|Friday, October 18, 2019
You are here: Home » Top News » फनी चक्रीवादळाने केले उग्र रूप धारण, 3 मे पर्यंत ओडिसा किनारपट्टीला धडकणार

फनी चक्रीवादळाने केले उग्र रूप धारण, 3 मे पर्यंत ओडिसा किनारपट्टीला धडकणार 

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

फनी चक्रीवादळ दक्षिण-पूर्वबंगालच्या दक्षिण-पश्चिम व लगतच्या भागात अत्यंत गंभीर रूप धारण केले आहे. सध्या ते 13.3 अंश उत्तर अक्षांश आणि 84.7 अंश पूर्व रेखांश स्थितीत असून, ओडिसा पुरीपासून 725 किमी दक्षिण-पश्चिम आणि आंध्रप्रदेश विशाखापट्टणपासून 510 किमी दक्षिण-पूर्वेकडे केंद्रीत आहे. आज ते उत्तर पश्चिम दिशेने जात आहे. त्यानंतर उत्तर-उत्तर पूर्व दिशेने ओडिसाकडे सरकेल. 3 मे पर्यंत फनी चक्रीवादळ ओडिसा किनारपट्टीवर गोपालपूर आणि चांदबाली दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. किनाऱयावरील प्रतिकूल परिस्थितीमुळे समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान कमी आर्द्रता तसेच किनारपट्टीवर वरच्या दिशेने वाढलेली वाऱयांची विषमता यामुळे चक्रीवादळाचा जोर थोडा कमी होण्याची शक्यता आहे.

तीव्र चक्रीवादळ किनारपट्टीला धडकण्याच्यावेळी जोरदार पाऊस व अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच 170 ते 185 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस समुद्रातील परिस्थिती धोकादायक असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. या काळात समुद्रात 13 ते 14 फूट उंच लाटा उसळण्याची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.