|Saturday, February 22, 2020
You are here: Home » उद्योग » रुचि सोयाच्या खरेदीसाठी पतंजलीची बोली मंजूर

रुचि सोयाच्या खरेदीसाठी पतंजलीची बोली मंजूर 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

इंदौर येथील कंपनी रुची सोया हिला खरेदी करण्यासाठी बँकांनी बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखाली पतंजली आयुर्वेदकडून 4,325 कोटी रुपयाच्या बोलीला मान्यता मिळाली आहे. सदरचा निर्णय हा मंगळवारी बँकांकडून 96 टक्के मताच्या आधारे याला मान्यता देण्यात आली आहे. रुची सोयावर बँकाचे 9,345 कोटी रुपयाचे कर्ज असून त्याची वसूली करण्यासाठी त्यांनी कंपनीच्या मागे तगादा लावण्यास सुरुवात केली आहे.

रुचीसोयाला जादाची मदत देणार

बोली प्रक्रियांमधुन अदाणी विल्मर यांनी माघार घेतल्यानंतर पतंजली आयुर्वेद ही एकमेव बोली लावणारी कंपनी ठरली. यांच्या अगोदरच्या महिन्यातही पतंजलीने 200 कोटी रुपये जादाचे बोलीत लावले. याव्यतिरिक्त रुचि सोयाची आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी पतंजली 1,700 कोटी आणखीन जादाचे देणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

एनसीएलटीने डिसेंबर 2017 मध्ये र्स्टॅंडर्ड चार्टर्ड बँक आणि डीबीएस बँकेच्या नोटीसीनुसार रुचीसोयाकडून थकबाकी वसूल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली होती. याकरीत कंपनीकडून शैलेंद्र अजमेरा यांची यासाठी निवड करण्यात आली.

Related posts: