|Sunday, May 26, 2019
You are here: Home » leadingnews » श्रीलंकेतील बॉम्बहल्ल्यानंतर इसिसची भारत आणि बांगलादेशात हल्ल्याची धमकी  

श्रीलंकेतील बॉम्बहल्ल्यानंतर इसिसची भारत आणि बांगलादेशात हल्ल्याची धमकी   

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

इस्लामिक स्टेट (इसिस)शी संलग्न असलेल्या अल मुरसलत नावाच्या दहशतवादी संघटनेनं श्रीलंकेप्रमाणेच आता भारत आणि बांगलादेशात दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली आहे. इसिसने अशा धमकीचे पोस्टर्सही जारी केले आहेत. बंगाल आणि हिंदमध्ये खलिफाचा लढा उभारणाऱयांचा आवाज कधीही बंद होऊ शकत नाही. आमच्या बदल्याची आग कधीही शांत होणार नाही. ईस्टरच्या दिवशीही श्रीलंकेत तीन चर्चं आणि तीन हॉटेलमध्ये आत्मघातकी हल्ला केला होता, त्यात 253 लोकांना मारण्यात आले, असे इसिसच्या दहशतवाद्यांनी सांगितले आहे.

 गुप्तचर विभागाच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, इसिसने अबू मोहम्मद अल-बंगालीला बांगलादेशातील आपला म्होरक्मया नियुक्त केला आहे. बंगालीला दहशतवादी हल्ल्याची योजना बनवणे आणि दहशतवाद्यांची भरती करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. धमकीचे पोस्टर जारी करण्याआधीही इसिसने बांगलादेशची राजधानी ढाकातल्या गुलिस्ताँ थिएटरमध्ये कमी तीव्रतेचा स्फोट घडवला होता. यात कोणाचाही मृत्यू झाला नसला तरी पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

Related posts: