|Monday, May 27, 2019
You are here: Home » Top News » राणीच्या बागेत येणार दोन बिबटय़ांची पिल्ले

राणीच्या बागेत येणार दोन बिबटय़ांची पिल्ले 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईतील राणीच्या बागेत नवीन पाहुणे येणार आहे. येत्या दोन महिन्यात येथे बिबटय़ांची जोडी दाखल होणार आहे. मंगळुरुमधील पिलीकुला प्राणिसंग्रहालयातून दोन बिबटय़ांना राणीच्या बागेत आणले जाणार आहे. मुंबईतील भायखळय़ात असलेल्या वीर जिजामाता भोसले उद्यानात प्राण्यांना पाहण्यासाठी बच्चे कंपनी आणि त्यांच्या पालकांची मोठी झुंबड उडत असते. मे महिन्यांच्या सुट्टय़ांमुळे राणीच्या बागेत मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र बिबटय़ांच्या दर्शनासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

’ड्रोगन’ असे नर बिबटय़ाचे नाव असून त्याचे वय दोन वर्ष आहे. तर पिंटो मादी बिबटय़ाचे नाव असून ती तीन वर्षांची आहे. दोन महिन्यानंतर या बिबटय़ांचे दर्शन मुंबईकरांना होणार आहे. राणीच्या बागेत 17 अद्ययावत पिंजऱयांची उभारणी सुरु असून लवकरच आणखी प्राण्यांचे देखील आगमन उद्यानात होणार आहे.

Related posts: