|Friday, July 19, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » कुत्र्याने खाल्ले 14 हजार रूपये

कुत्र्याने खाल्ले 14 हजार रूपये 

ऑनलाईन टीम / नॉर्थवेल्स :

नॉर्थ वेल्समध्ये कुत्र्याने केलेला कारनामा तुम्ही ऐकलात तर तुम्ही डोक्याला हात लावाल. एका 9 महिन्यांच्या कुत्र्याने त्याच्या मालकाचे 160 पाउंड्स(साधारण 14 हजार 500) रूपये खाल्लेत आहेत. Ozzie असे या कुत्र्याचे नाव आहे. हा कुत्रा लेब्राडूडल प्रजातीचा आहे. या कुत्र्याने खाल्लेले पैसे पोटातून परत काढण्यासाठी 130 पाउंड(जवळपास 12 हजार रूपये) खर्च करावा लागला आहे.  

काय आहे प्रकरण?

नॉर्थ वेल्सला राहणारे जुडिथ(64) आणि नील राइट(66) खरेदी करण्यासाठी बाजारात गेले होते. यादरम्यान त्यांचा कुत्रा Ozzie घरी एकटाच होता. जेव्हा दोघेही खरेदी करून घरी परतले तेव्हा त्यांनी पाहिलं की, नोटांची तुकडे किचन आणि हॉलमध्ये पडलेले आहेत. तर एका कोपऱयात Ozzie बसलेला आहे. जूडिथ आणि नील यांच्या लक्षात आलं की, हा कारनामा त्यानेच केला आहे.

ओजीने पैसे काढले कुठून?

रिपोर्ट्सनुसार, ओजीला घराच्या लेटरबॉक्समधून एक पॅकेट मिळालं होतं. त्यातील 20 पाउंडच्या नोटा त्याने फाडून खाल्ल्या. नीलने ते पॅकेट लेटरबॉक्समध्ये ठेवणाऱया व्यक्तीस फोन लावला, जेणेकरून हे कळावं की त्यात किती पैसे होत. त्यानंतर ओजीला प्राण्यांच्या रुग्णालयात नेण्यात आलं. नंतर डॉक्टरांनी त्याच्या पोटातून काही नोटा आणि प्लास्टिक बॅग काढली. यासाठी ओजीच्या मालकाला 130 पाउंड खर्च करावे लागले. एकूण 290 पाउंड्सचं नुकसान झाले आहे.