|Monday, December 16, 2019
You are here: Home » Top News » काँग्रेसवाले माझ्या हत्येचे स्वप्न पाहत आहेत

काँग्रेसवाले माझ्या हत्येचे स्वप्न पाहत आहेत 

 

 ऑनलाईन टीम / आयोध्या :  काँग्रेसवाले माझ्या हत्येचे स्वप्न पाहताहेत’, असा हल्लाबोल मोदी यांनी केला. काँग्रेसचा भूतकाळ, वर्तमान नेतृत्व व सामाजिक-आर्थिक-परराष्ट्र नीतीवर सातत्याने आक्रमक टीका करणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मध्य प्रदेशातील प्रचार सभेत या पक्षावर धक्कादायक आरोप केला.

मध्य प्रदेशातील सभेत मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य करतानाच, भाजपच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विरोधातील काँग्रेस उमेदवार दिग्वजिय सिंह यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, ’काँग्रेसवाले माझा इतका द्वेष करतात, की ते माझ्या हत्येचे स्वप्न पाहताहेत. पण ते हे विसरताहेत की, संपूर्ण देश माझ्या पाठीशी उभा आहे.’ वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईक यांच्यासह एका व्यासपीठावर दिसणाऱया दिग्वजिय सिंह यांच्या जुन्या व्हिडीओवरून पंतप्रधानांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. ’डिग्गीराजांनी झाकीर नाईकला खांद्यावर घेत नाचवले. काँग्रेस सरकारने झाकीर नाईकला दहशतवादावर पोलिसांना मार्गदर्शन करण्यास सांगितले होते. श्रीलंकेने नाईकचे टीव्ही चॅनेल बंद केले आणि भारतातील याआधीचे सरकार नाईकला शांततेचे राजदूत म्हणून गौरवत होते’, अशी टीका मोदी यांनी केली.

 

Related posts: