|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » उद्योग » ऍमेझॉन इंडियाची निर्यात अब्ज डॉलरच्या पुढे

ऍमेझॉन इंडियाची निर्यात अब्ज डॉलरच्या पुढे 

वृत्तसंस्था /बेंगळूर :

अमेरिकेतील ऑनलाईन रिटेलर्स व्यापाऱयांची ऍमेझॉन या ऑनलाईन क्षेत्रात कार्यरत असणाऱया कंपनीच्या व्यवहारात विक्री करणाऱयांची संख्या 56 टक्क्यांनी वाढली आहे. त्यानंतर त्यांची भारतातील निर्यातीच्या विक्रीत 1 बिलियन डॉलर्सच्या पुढे गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर आगामी काळात जागतिक स्तरावरील विक्री वाढत गेल्यास निर्यात 5 अब्ज डॉलर्सच्या पुढे जाण्याचा अंदाज ऍमेझॉन इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी व्यक्त केला आहे.

कंपनीने या संदर्भात माहिती देताना म्हटले आहे. की ई-कॉमर्सच्या प्लॅटफॉर्मवर कंपनीच्या नियमावलीत बदल करण्यासोबतच सरकारसोबत काम करत आहे. कारण भविष्यात कंपनीचे निर्यात क्षेत्र वाढावे हाच उद्देश ठेऊन आपली वाटचाल सुरु ठेवणार असल्याचे ऍमेझॉन इंडियाचे वरीष्ठ उपाध्यक्ष अमित अग्रवाल यांनी सांगितले. 

ग्राहकांसाठी डिजिटल सुविधा

मेक इंन इंडियाला चालना देण्यासाठी देशातील होणाऱया कागदपत्रांमध्ये न अडकता त्यात घट करत सर्व सेवा डिजिटल मार्गांनी सुरु करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी डिजिटल निर्यातीसाठी वेगळी नियमावली तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले

ऍमेझॉनची जागतिक स्तरावरील सेवा

ऍमेझॉनने 2015 मध्ये जागतिक स्तरावरील विक्रीला सुरुवात केली आहे. त्याच्या आधारे कंपनी लहान आणि मध्यम व्यवसायांना जोडण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी 30 कोटी ऍक्टीव्ह युजर्सच्या माध्यमातून ग्राहकांना जोडण्याचा प्लॅटफॉम उभारणार आहे. सध्या या सुविधेच्या आधारे जवळपास 50 हजार निर्यातदार व्यवसाय ते ग्राहक आणि व्यवसाय ते व्यवसाय यांच्याशी जोडले आहेत. यातून आपल्या सेवेचे आदन प्रदान करत असल्याचे पहावयास मिळत आहे. 

निर्यात होणारे उत्पादन

कापड, घरगुती फर्निचर, औषधी उत्पादने ऍमेझॉनची सहयोगी कंपनी वॉलमार्ट निर्यात होतात. तर भारत सरकार आपली निर्यात क्षमता जागतिक पातळीवर 1.6 टक्क्यांनी वाढवत 3.4 टक्क्यांवर घेऊन जाणार असल्याचा विश्वास व्यक्त करत आहे.