|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भंडारी को. ऑ. क्रेडिट सोसायटीचा 5 रोजी रौप्य महोत्सव

भंडारी को. ऑ. क्रेडिट सोसायटीचा 5 रोजी रौप्य महोत्सव 

प्रतिनिधी /पणजी :

दि. भंडारी को. ऑ. क्रेडिट सोसायटीला यावर्षी 25 वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्त सोसायटीने रविवार दि. 5 रोजी दुपारी 3 वा. पणजी येथील गोवा राज्य सहकारी बँक मर्यादित सभागृह येथे रौप्य महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी 25 वर्षात सोसायटीच्या उत्कर्षासाठी झटलेल्या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये सोसायटीचे संस्थापक सदस्य, आजी-माजी संचालक, कर्मचारी, पिग्मी कलेक्टर व इतरांचा समावेश आहे अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष गुरुनाथ नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सोसायटीचे उपाध्यक्ष नवनाथ नाईक, सचिव आनंद गांवकर, संचालक नरेंद्र आजांवकर, चंदन नाईक मुळे, रामनाथ मामलेकर, देवेंद्र चोडणकर आणि सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत मांद्रेकर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला पणजी महानगरपालिकेचे महापौर उदय मडकईकर, सहकार सोसायटीचे निबंधक मिनिनो डिसोझा, सहकार सोसायटीचे उपनिबंधक दिपेश प्रियोळकर, गोवा राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष उदय प्रभु, गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक, रुद्रेश्वर देवस्थान हरवळेचे अध्यक्ष यशवंत माउकर, वरीष्ठ वकील ऍड. गोकुळदास नाईक आणि सहकारी कार्यकर्ता प्रभाक वेर्णेकर यांची उपस्थिती असणार आहे.

अध्यक्ष गुरुनाथ नाईक यांनी सोसायटीबद्दल अधिक माहिती दिली. ते म्हणाले की, 1993 साली स्थापना झालेल्या सोसायटीच्या राज्यभरात एकूण 11 शाख आहेत. हल्लीच शिवोली येथे एप्रिलमध्ये 12व्या शाखेचे उद्घाटन केले आहे. सोसायटीचे एकूण 14,674 भागधारक आहेत. सोसायटीकडे भागभांडवल 4 कोटी 16 लाख 25 हजार आहे. एकूण 70 कोटी 11 लाखांच्या ठेवी असून 60 कोटी 43 लाख कर्ज वितरीत करण्यात आले आहे. सोसायटीला यावर्षी 1 कोटी 40 लाख नफ्ढा झाला आहे. एकूण अउत्पादित कर्जाची टक्केवारी 2.47 तर निव्वळ अउत्पादित कर्जाची टक्केवारी 0.32 आहे. सोसायटीला गेल्या 5 वर्षात ऍडीट क्लासिफ्ढिकेशनमध्ये ‘अ’ दर्जा प्राप्त झाला असून भागधारकांना 13 टक्के लाभांश देण्यात आलेला आहे. कर्जाची मर्यादा 15 लाख आहे.

Related posts: