|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » leadingnews » काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली युपीएचे सरकार येणार : राहुल गांधी

काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली युपीएचे सरकार येणार : राहुल गांधी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा लोकसभा निवडणुकीत पराभव होईल आणि काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली यूपीएचे सरकार येईल, असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमाच त्यांची ताकद असून, त्यांची प्रतिमा मलिन करणे हेच माझे ध्येय्य आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

एका वृत्तपत्राने घेतलेल्या मुलाखतीत राहुल गांधी बोलत होते. राहुल म्हणाले, मनमोहन सिंग पंतप्रधान असताना तीन सर्जिकल स्ट्राइक करण्यात आले होते, मात्र, त्याचा गवगवा करण्यात आला नव्हता. आम्हाला लष्कराच्या कामगिरीचे ाजकारण करायचे नव्हते. आम्हाला जवानांचा वापर करायचा नव्हता. मोदी जवानांचा राजकीय फायद्यासाठी वापर करत आहेत. आम्ही जवानांना सलाम करतो. त्यांचा आदर करतो.