|Monday, July 22, 2019
You are here: Home » Top News » महिला सक्षमीकरणासाठी बुरखा, घुंगटवरही बंदी घाला : जावेद अख्तर

महिला सक्षमीकरणासाठी बुरखा, घुंगटवरही बंदी घाला : जावेद अख्तर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

महिला सक्षमीकरणासाठी बुरख्याबरोबरच घुंगटप्रथेवरही बंदी घालण्यात यावी, अशी भूमिका प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी मांडली आहे. केंद्र सरकारने राजस्थानात होत असलेल्या 6 मेच्या मतदानापूर्वी घुंगट प्रथेवरही बंदी घालावी, असे अख्तर यांनी म्हटले आहे.

श्रीलंकेत जो कायदा आला आहे, त्यानुसार तुम्ही तुमचा चेहरा झाकू शकत नाही. बुरखा वापरा. मात्र, चेहरा झाकलेला असता कामा नये. हे त्यांनी कायद्यात अंतर्भूत केले आहे. भारतात जर तुम्हाला बुरखा परिधान करण्यावर प्रतिबंधासाठी कायदा हवा असेल तर राजस्थानमधील मतदान होण्यापूर्वी तेथे कुणीही घुंगट घालणार नाही अशी घोषणा केद्र सरकारने करावी. बुरखाबंदीही व्हावी आणि घुंगटबंदीही व्हावी, असे जावेद अख्तर यानी म्हटले होते. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास झाला होता, असे त्यांनी म्हटले आहे.