|Sunday, August 25, 2019
You are here: Home » उद्योग » अमेरिकेच्या उत्पादनावरील शुल्क आकारणीचा कालावधी वाढविला

अमेरिकेच्या उत्पादनावरील शुल्क आकारणीचा कालावधी वाढविला 

नवी दिल्ली

  भारतात आयात करण्यात येणाऱया बदाम आर्कोट आणि डळीसह अन्य 29 उत्पादनावर लावण्यात येणाऱया आयात शुल्का लागू करण्याच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. ही वाढ येत्या 16 मे पर्यंत केल्याची माहिती वित्त मंत्रालयाकडून सादर करण्यात आलेल्या आदीसुचनेमधून सांगण्यात आले आहे. अमेरिकेकडून आयात करण्यात येणाऱया विशेष उत्पादनावर आकाण्यात येणाऱया  शुल्काची तारीख वाढविण्यात आल्यावर अमेरिका कच्चे पोलाद आणि ऍल्युमिनिअमवर अधिकचे शुल्क आकारल्यानंतर भारताने जून 2018 मध्ये तोंडी शुल्क आकारण्याचा निर्णय सादर केला होता. तेव्हापासून आतापर्यंत अनेक वेळा शुल्क आकारणीत सवलत दिली आहे. तर भारतीय निर्यातीला मिळणाऱया प्रोहोत्साहानाला मागे घेणार असल्याची तयारी भारत करत असल्याचे पहावयास मिळत आहे.