|Thursday, August 22, 2019
You are here: Home » उद्योग » प्रवासी विमा असावा का?,असल्यास कोणते फायदे

प्रवासी विमा असावा का?,असल्यास कोणते फायदे 

प्रवासी विमा का आवश्यक? विदेशातील प्रवासादरम्यान मिळणार फायदे

वृत्तसंस्था/ बेंगळूर

परदेशात फिरायला जाण्यासाठी अनेक नागरिक आपल्या जवळच्या व ओळखीच्या टॅव्हलिंग एजन्सीसचा आधार घेत असतात परंतु याच काळात प्रवासादरम्यान कोणती दुर्घटना झाल्यास व त्यामध्ये आपले किमती साहित्याची चोरी झाल्यास, आरोग्याचा विमा महत्वाचा असतो. कारण प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची आपत्तीजनक परिस्थती निर्माण झाल्यास या विम्याचा फायदा मिळतो. या योजनेत आरोग्याची तात्काळ सेवा, अन्य कोणत्याही कारणास्तव प्रवास रद्द करावा लागल्यास किंवा विदेशातील प्रवासावेळी कोणतीही समस्या निर्माण झाल्यास आपल्याला या विम्याचे संरक्षण मिळते.

प्रवासात साहित्य हरवल्यास नो टेन्शन

लांबपल्याचा प्रवास करताना अचानकपणे आपले सोबतचे साहित्य हरवल्यास , किंवा साहित्याची तपासणी करताना जर कोणत्याही प्रकारचे साहित्य हरवल्यास  आपल्याला प्रवासी विम्याचे संरक्षण असल्यामुळे आपल्याला त्याची भरपाई मिळण्याची सुविधा निर्माण होते. आणि आपल्याकडे असलेल्या व हरवलेल्या साहित्याची परतफेड विम्यामुळे होत असल्याची माहिती विमा बाजारातील मुख्य बिझनेस अधिकारी तरुण माथुर यांनी दिली. 

दहशतवादी हल्ल्याचा ही विम्यामध्ये समावेश

विमाधारकांना जगभरची भ्रमंती करताना अनेक भाषा, प्रांत, खाण्यापिण्याच्या सवयी या जशा वेगळय़ा आहेत. तशा सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनही मोठी जोखीम बाहेरच्या देशात गेल्यावर मिळवावी लागते. मग त्यामध्ये जगाला भेडसावणाऱया दहशतवाद्याचा वाढता धोका हा नव्याने प्रवास करणाऱया प्रवाशाला तोंड त्यावे लागते. त्यामध्ये अशा संकटामधून वाचण्यासाठी विम्याचे कवच दिले जाईल असे निश्चितपणे सांगणे कठिणच आहे. कारण त्या विमा योजनेत जर त्याप्रकारची सुविधा उपलब्ध असेल तरच ती सुविधा मिळू शकते अन्यथा नाही असे नमूद करण्यात आले आहे. 

प्रवास रद्द झाल्यास विमाधारकांना दिलासा

आपण कोणत्या ठिकाणी प्रवासाला जायचे आहे ते नियोजित योजना आखल्यास आणि त्यात कोणत्याही प्रकाराचा खंड पडल्यास, घरगुती आजारपण, विमान रद्द, हॉटेल बुकिंग रद्द अशासह अन्य कोणत्याही कारणास्तव जर आपला प्रवास रद्द ााला तर विमा कंपनीकडून संरक्षण दिले जाते.

विदेशात चोरी झाल्यास मिळणार भरपाई

विदेशात प्रवास करायला गेल्यावर आपण राहत असलेल्या ठिकाणी किंवा अन्य कोठेही आपल्या राहत्या ठिकाणी चोरी झाल्यास त्यावेळी होणाऱया मानसिक तणाव व अन्य प्रकारचा झालेल्या त्रासाचा विचार लक्षात घेऊनच संबंधीत विमाधारकांना संपूर्ण भरपाई मिळण्याची सुविधा  उपलब्ध करुन दिली जाते.