|Friday, July 19, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » फेसबुकचा नवीन लूक लवकरच

फेसबुकचा नवीन लूक लवकरच 

 

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  फेसबुक आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने फेसबुक डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये फेसबुकच्या नव्या डिझाईनची घोषणा केली आहे. फेसबुकने या नव्या डिझाईनमध्ये लाँच केल्यापासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सिग्नेचर ब्लू बॅनर रिमूव्ह करण्यात आला आहे. कंपनीच्या नव्या डिझाईनमध्ये मेसेजिंग अ‍Ÿप, ऑनलाईन मार्केट प्लेस आणि व्हिडीओ ऑन डिमांड हे एका बाजूला देण्यात आले आहेत. नवं फीचर युजर्ससाठी प्रायवेट फीड उपलब्ध करण्यासाठी डिझाईन करण्यात आल्याची माहिती फेसबुकने दिली आहे.

फेसबुकच्या नव्या डिझाईनमध्ये युजर्सच्या प्रायव्हसीवर फोकस करण्यात आलं आहे. हे डिझाईन प्रायव्हेट आणि इनक्रिप्टेड म्हणजेच सुरक्षितेसाठी तयार करण्यात आलं आहे. यामुळे कम्युनिकेशन हे जास्त सुरक्षित होणार आहे. याशिवाय फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मवरून अफवा आणि फेक न्यूज रोखण्यासाठी मदत करत आहे. अपडेटनंतर युजर्स कोणता ग्रुप जॉईन करतील तेव्हा त्यांना पर्सनलाइज्ड न्यूज फीड मिळणार आहे. हे फीड तुमच्या मित्रमैत्रिणींच्या जनरलाइज्ड फीडपेक्षा वेगळं असणार आहे. तसेच फेसबुक ब्राऊज केल्यास ग्रुप इंटरॅक्शनचा पर्याय मिळणार आहे.