|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

मिथुनेत मंगळ, मेषेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात मोठे काम मिळवता येईल. जम बसेल. कर्जाचे काम होईल. मागील येणे वसूल करा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे डावपेच यशस्वी होऊ शकतात. सोपे नाही पण जिद्द ठेवा. तडजोड करावी लागली तरी एकीचे बळ उपयोगी पडेल. घरातील समस्या, वाद कमी होईल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी, पैसा मिळेल. कोर्टकेस यशस्वी होईल. वाटाघाटीत फायदा होईल.


वृषभ

मिथुन राशीत मंगळ, मेषेत शुक्र प्रवेश करीत आहे. तुमचा आत्मविश्वास राहील. नम्रपणे बोलूनच तुम्ही कामे करू शकाल. धंद्यात अडचण येईल. कामगार नाराज होतील. मध्यस्थ काडय़ा घालण्याचा प्रयत्न करेल. नोकरीत कायद्यात बसणारे काम करा. चूक होईल. नवीन माणसावर विश्वास जास्त ठेवू नका. आर्थिक व्यवहारात फसगत होईल. राजकीय, सामाजिक कार्यात वरि÷ांची मर्जी राखा. आरोप तुमच्यावर येईल. स्पर्धेत टिकून रहा.


मिथुन

तुमच्याच राशीत मंगळ, मेषेत शुक्र प्रवेश करीत आहे. सोमवार, मंगळवार रागावर ताबा ठेवा. वाहन जपून चालवा. धंद्यात चांगली संधी मिळेल. मागील येणे वसूल करा. घरात शुभ समाचार मिळेल. मुले प्रगती करतील. राजकीय, सामाजिक कार्यात प्रभाव राहील. वाटाघाटीत यश मिळेल. नोकरीत वरि÷ांची तुमच्यावर कृपा होईल. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. कोर्टकेस यशस्वी होईल. परदेशात जाण्याचा योग येईल.


कर्क

मिथुनेत मंगळ, मेषेत शुक्र प्रवेश करीत आहे. गुप्तशत्रू तुमच्या कार्यात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न बुधवार, गुरुवारी करतील. संयम ठेवा. कायदा पाळा. धंद्यात जम बसेल. मोठय़ा लोकांची मदत मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा वाढेल. लोकप्रियता मिळेल. अधिकार प्राप्त होईल. नोकरीत फायदा होईल. घर, वाहन खरेदी होईल. कला, क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. पुरस्कार मिळेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल.


सिंह

मिथुनेत मंगळ, मेषेत शुक्र प्रवेश करीत आहे. तुमच्या प्रत्येक कामात यश मिळेल. सहनशीलता ठेवा. धंद्यात वाढ होईल. मोठे कंत्राट मिळेल. मागील येणे वसूल करा. राजकीय, सामाजिक कार्यात  वर्चस्व राहील. लोकांचा पाठिंबा मिळेल. घरातील तणाव मिटवण्यात यश मिळू शकेल. शुक्रवार, शनिवार मन अस्थिर होईल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी, पैसा मिळेल. कोर्टकेस जिंकता येईल. आनंदी रहाल. शेअर्समध्ये गुंतवणूक योग्य सल्ल्यानेच करा.


कन्या

मिथुनेत मंगळ, मेषेत शुक्र प्रवेश करीत आहे. तुमचा आत्मविश्वास टिकून राहील. कुठेही अतिशयोक्तीपूर्ण वागू, बोलू नका. ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा कमी होईल. धंद्यात तडजोड करावी लागेल. नोकरांना सांभाळून घ्यावे लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्यावर टिका होईल. जवळचे लोक नाराज होतील. घरात तणाव होईल. वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. धावपळ होईल. काही ठिकाणी तटस्थ रहा. वाकडी वाट धरू नका. व्यसनाने नुकसान होईल.


तुळ

 मिथुनेत मंगळ, मेषेत शुक्र प्रवेश करीत आहे. तुमचा प्रभाव सर्व दूर राहील. नवीन ओळखी होतील. धंद्यात वाढ होईल. सोमवार, मंगळवार तुमच्याशी स्पर्धा होईल. कामात सावध रहा. व्यवहार जपून करा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे कौतुक होईल. वरि÷ांच्या कामात मदत करावी लागेल. पद मिळेल. कर्जाचे काम मार्गी लागेल. कला, क्रीडा क्षेत्रात पुरस्कार, लाभ होईल. कोर्टकेस जिंकाल. नव्या कामाला आरंभ करता येईल.


वृश्चिक

मिथुनेत मंगळ, मेषेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात तुमचे डावपेच यशस्वी होतील, असे समजू नका. काही बाबतीत तडजोड करावी लागेल. जवळचेच लोक काडय़ा घालतील. घरात तणाव होईल. स्वत:च्या प्रकृतीकडे लक्ष द्या. वाहन जपून चालवा. राजकीय, सामाजिक कार्यात स्पर्धा वाढेल. विरोध होईल. खोटा आरोप होईल. कला, क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. नव्या ओळखीवर भाळून जाऊ नका. गुपित उघड होईल. बुधवार, गुरुवार मनावर दडपण येईल. वस्तू सांभाळा.


धनु

मिथुनेत मंगळ, मेषेत शुक्र प्रवेश करीत आहे. तुमचा उत्साह वाढेल. प्रतिष्ठा मिळेल. पण काम करण्यात अडथळे येतील. प्रकृतीची काळजी घ्या. थकवा वाढेल. धंद्यात जम बसेल. काम मिळेल. मागील येणे वसूल करा. राजकीय, सामाजिक कार्यात गुप्त कारवाया होतील. बुधवार, गुरुवार महत्त्वाचे काम करून घ्या. नामवंत लोक भेटतील. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कोर्टकेसमध्ये दिशा मिळेल. दूरच्या प्रवासाचे ठरवाल.


मकर

मिथुनेत मंगळ, मेषेत शुक्र प्रवेश करीत आहे. बुधवार, गुरुवार विरोध होईल. कामाचा व्याप वाढेल. रागावर ताबा ठेवा. धंद्यात किरकोळ समस्या येईल. नामवंत लोकांचा परिचय होईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्यावर टीका होईल. त्यामुळे अधिक प्रसिद्धी मिळेल. तुम्ही तटस्थ रहा. उत्तर देण्यापेक्षा निरीक्षण करा. घरातील लोकांचा गैरसमज होईल. तुम्हाला वेळ कमी पडेल. कला, क्रीडाक्षेत्रात धावपळ होईल. नवे काम मिळेल. घर, जमीन खरेदीचा विचार कराल.

कुंभ

मिथुनेत मंगळ, मेषेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात चांगली प्रगती होईल. गुंतवणूक वाढेल. शेअर्समध्ये लाभ होईल. योग्य सल्ल्याने पैसे गुंतवा. घरात शुभ समाचार मिळेल. अविवाहितांना स्थळे येतील. राजकीय, सामाजिक कार्यात वर्चस्व दिसेल. लोकसंग्रह वाढेल. डावपेच यशस्वी होतील. पद मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात मोठी चमक दिसेल. नोकरीत चांगला बदल करता येईल. घर, जमीन इ. खरेदीचा विचार होईल.


मीन

मिथुनेत मंगळ, मेषेत  शुक्र प्रवेश करीत आहे. तुमच्या धंद्यातील अडचणी दूर होतील. योग्य माणसे कामासाठी मिळतील. उत्साह वाढेल. थकबाकी वसूल होईल. राजकीय, सामाजिक कार्यात अधिकार मिळेल. योग्य निर्णय घ्याल. पद मिळेल. तुमच्या मनातील कामे होतील. कला, क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. मातब्बर लोकांचा सहवास मिळेल. प्रेरणादायी घटना घडेल. विवाह ठरू शकेल. घर, वाहन खरेदी कराल.

 

Related posts: