|Friday, October 18, 2019
You are here: Home » leadingnews » मोदीजी तुमचे कर्म तुमची वाट पाहत आहे

मोदीजी तुमचे कर्म तुमची वाट पाहत आहे 

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

‘लढाई संपलेली आहे. तुमचे कर्म तुमची वाट पाहत आहे,’ असे राहुल यांनी ट्विट केले आहे. मोदींनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर राहुल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

‘मोदी जी, लढाई संपलेली आहे. तुमचे कर्म तुमची वाट पाहत आहे’, तुमची तुमच्याबद्दलची वैयक्तिक मते माझ्या वडिलांवर लादल्याने तुमची सुटका होणार नाही’, असे राहुल यांनी ट्विट केले आहे.

नरेंद्र मोदींनी ‘तुमच्या वडिलांची प्रतिमा तुमच्या राजदरबाऱयांनी मिस्टर क्लीन अशी रंगवली होती. पण त्यांच्या आयुष्याची अखेर भ्रष्टाचारी अशीच झाली. नामदार, हा अहंकार तुम्हाला खाऊन टाकेल. हा देश चुका माफ करतो, पण फसवेगिरी कधीही माफ करत नाही,’ असं मोदी एका जाहीर सभेत म्हणाले होते.