|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » Top News » व्यंगचित्रकारात जुलमी राजवट उलथवून लावण्याचे सामर्थ्य

व्यंगचित्रकारात जुलमी राजवट उलथवून लावण्याचे सामर्थ्य 

 ऑनलाईन टीम / मुंबई :

व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यात इतकी ताकद असते की एखादी जुलमी राजवट उलथवली जाऊ शकते, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट केले आहे. आज जागतिक व्यंगचित्रकार दिन आहे. त्या निमित्त त्यांनी ट्विटरवरुन देशातील व्यंगचित्रकारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

‘व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यात इतकी ताकद असते की एखादी जुलमी राजवट उलथवली जाऊ शकते. आज जागतिक व्यंगचित्रकार दिन आहे. ह्या निमित्ताने देशभरातील माझ्या व्यंगचित्रकार सहकाऱयांना शुभेच्छा तर आहेतच पण तुमच्या प्रतिभेची देशाला आज सगळय़ात जास्त गरज आहे हे मात्र विसरू नका’, असे राज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.