|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » सोन्याच्या दरात घट,चांदीचे दर स्थिर

सोन्याच्या दरात घट,चांदीचे दर स्थिर 

 

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  जागतिक बाजारातून मंदीचे संकेत आल्यामुळे आणि भारतीय बाजारातही मागणी कमी असल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात घट नोंदली गेली आहे. अखिल भारतीय सराफा संघटनेने जारी केलेल्या माहितीनुसार शनिवारी दिल्ली सराफ शुद्ध सोन्याचे दर 50 रुपयांनी कमी होऊन 32,470 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले तर स्टॅडर्ड सोन्याचे दर 50 रुपयांनी कमी होऊन 32,300 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.

औद्योगिक क्षेत्राकडून काही प्रमाणात मागणी असल्यामुळे तयार चांदीचे दर मात्र 37,700 रुपये प्रति किलो ह्या पातळीवर स्थिर राहिले. जागतिक चलनबाजारात आणि शेअरबाजारात अस्थिर वातावरण असल्यामुळे आगामी काही दिवस तरी सोने आणि चांदीचे दर अस्थिर राहण्याची शक्‍³ाता असल्याचे व्यापाऱयांनी सांगितले. मात्र आगामी काळात भारतात सोन्याची आयात वाढण्याची शक्‍³ाता आहे.