|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » बिग बी कडून देशवासीयांना मदतीचे आवाहन

बिग बी कडून देशवासीयांना मदतीचे आवाहन 

ऑनलाईन टीम / मुंबई :

ओडिशातल्या पुरी आणि भुवनेश्वरसह अनेक भागात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी विजेचे खांब आणि झाडे उन्मळून पडले आहेत. तर आत्तापर्यत फनी चक्रीवादळाने ओडिशामध्ये 16 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 160 जण जखमी आहेत. तेथील नागरिकांचे जीवन पूर्ववत आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. फनी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या लोकांना त्यांनी मदत केली आहे, तुम्हीही करा’ असे अमिताभ यांनी ट्विट केले आहे.

‘चाहे जितना भी हो प्रचंड तूफान, हर तूफान से लडेंगे हम, न अकेले तुमको छोडा था, न अकेले कभी छोडेंगे हम, जो घर उजड गए, उन्हें फिर से बसायेंगे हम, हर चोट पर मरहम लगाएंगे हम’ असे बिग बींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.