|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » मनोरंजन » धकधक गर्ल छोटय़ा पडद्यावर

धकधक गर्ल छोटय़ा पडद्यावर 

 

ऑनलाईन टीम / मुंबई :  आपल्या मोहक अदाकारीने सिनेरसिकांना घायाळ करणारी ‘धकधक गर्ल’ अभिनेत्री माधुरी दीक्षित आता छोटय़ा पडद्यावर पदार्पण करत आहे. ’डान्स दिवाने’ या रियालिटी शोच्या दुसऱया भागात माधुरी कोरियॉग्राफर तुषार कालिया आणि दिग्दर्शक शशांक खेतान यांच्यासोबत परीक्षकाच्या भुमिकेतून पुढे येणार आहे. या रियालिटी शोच्या चित्रीकरणाच्या कामात माधुरी सध्या व्यस्त आहे.

या कार्यक्रमाचं चित्रीकरण मड आयलंडमधील ऐरंगल गावात शुक्रवारी सकाळी 11 वाजल्यापासून चालू झालं. रात्री उशीरापर्यंत हे चित्रीकरण चालू होतं. चित्रीकरणासाठी ऐरंगल गावाचा लुक एकदम बदलून टाकण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतं.

 

Related posts: