|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Automobiles » महिंद्राची टीयुव्ही300 भारतात लाँच

महिंद्राची टीयुव्ही300 भारतात लाँच 

 

ऑनलाईन टीम / मुंबई :  एसयुव्ही कार सेगमेंटमध्ये जगभरातील कंपन्या आपल्या वाहनांना नवं तंत्रज्ञान आणि लेटेस्ट फीचर्ससह लाँच करत आहेत. याशिवाय अनेक कंपन्यांनी आपल्या जुन्या वाहनांना अपडेट करुन पुन्हा लाँच केलं आहे. यामध्ये आता महिंद्रा अँड महिंद्राच्या (M&M) Mahindra TUV300 चाही समावेश झाला आहे. कंपनीने 2019 Mahindra TUV300 फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केलं आहे. या अपडेटेड व्हर्जनमध्ये कारच्या आतून आणि बाहेरुन अनेक कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. ग्राहकांना सात आकर्षक रंगांमधून निवड करता येणार असून त्यात हायवे रेड आणि मिस्टिक कॉपर या दोन नव्या रंगांचाही समावेश करण्यात आला आहे. स्टायलिश ड्युअल टोनशिवाय लाल आणि काळा/ चंदेरी आणि काळा, उठावदार काळा, मॅजेस्टिक सिल्व्हर आणि पर्ल व्हाइट हे मूळ रंगही उपलब्ध आहेत. सध्याच्या व्हेरिएंटशिवाय (टीफोरप्लस, टीसिक्सप्लस, टीएट आणि टीटेन) टी10(ओ) चा पर्यायी पॅकही उपलब्ध आहे, ज्यात लेदर सीट्स आणि लंबर सपोर्ट मिळेल.