|Sunday, May 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » दातांच्या शस्त्रक्रियेदरम्यान अतिरक्तस्त्रावामुळे तरुणीचा मृत्यू

दातांच्या शस्त्रक्रियेदरम्यान अतिरक्तस्त्रावामुळे तरुणीचा मृत्यू 

 

 पिंपरी/ प्रतिनिधी :  दातांची शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या एका तरुणीचा शस्त्रक्रिये दरम्यान अतिरक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना निगडी प्राधिकरण येथील स्टर्लिंग आयुर्वेदिक रुग्णालयात घडली.

धनश्री जाधव (वय 23, रा. नेरे, मारुंजी) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर हलगर्जीपणा करणारे डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासणाविरुद्ध धनश्रीच्या नातेवाईकांनी निगडी पोलिसात तक्रारी अर्ज दाखल केल्यानंतर डॉक्टर दाम्पत्य फरार झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धनश्री हिला दातांची समस्या होती. ती निगडी येथील स्टर्लिंग आयर्वेदिक रुग्णालयात गेल्या दीड वर्षांपासून ‘ट्रीटमेंट’ घेत होती. शस्त्रक्रियेसाठी ती आठ दिवसापासून रूग्णालयात दाखल झाली होती. उपचार सुरु असताना अतिरक्तस्राव झाल्याने धनश्रीची प्रकृती ढासळली. अतिरक्तस्राव झाल्याने तिचा दुर्देवी मृत्यू झाला. याकडे डॉक्टरांनी गांभीर्याने न पाहिल्याने धनश्रीचा मृत्यू झाल्याची लेखी तक्रार आई वडिलांनी निगडी पोलिसांकडे केली आहे. मात्र, धनश्रीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजले नसून निगडी पोलीस तपास करत आहेत.

 

Related posts: