|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » येरवडय़ात सांडपाण्याचा पूर

येरवडय़ात सांडपाण्याचा पूर 

 

ऑनलाईन टीम / पुणे :  पुण्यात पाणी रस्त्यावर पाणी येण्याच्या घटना सुरुच आहेत. आज सकाळी येरवडा भागातील सांडपाण्याची वाहणी तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर आले. यामुळे या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. वाहनचालकांना या सांडपाण्यातूनच मार्ग काढावा लागला. अखेर पुणे महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱयांनी तीन तास शोध घेतल्यानंतर ही समस्या सोडविण्यात आली. परंतु तोपर्यंत येथील रहिवासी आणि वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

पुण्यात कालवा फुटून त्याचे पाणी दांडेकर पूल वसाहतीत शिरल्याने गेल्या वषी ऑक्टोबरमध्ये हाहाकार उडाला होता. अनेकांचे संसार रस्त्यावर आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा जलवाहिनीचा वाल्व्ह नादुरुस्त झाल्याने पाणी रस्त्यावर आले होते. काही दिवसांपूर्वी देखील जनता वसाहत येथे पाणी शिरले होते. अशा घटना वारंवार घडत असताना आज पुन्हा येरवडा भागात सकाळी सांडपाण्याची वाहिनी तुंबली. त्यामुळे येरवडा गाडीतळ ते गुंजन चौकापर्यंत रस्त्यावर पाणीच पाणी आले होते. या घाणेरडय़ा पाण्यातून वाहनचालकांना मार्ग काढावा लागला. तसेच पायी चालणाऱया नागरिकांना देखील या प्रकारामुळे अडचणींचा सामना करावा लागले.