|Saturday, January 25, 2020
You are here: Home » मनोरंजन » अमोल कागणेने घटवले 7 किलो वजन

अमोल कागणेने घटवले 7 किलो वजन 

मनोरंजन क्षेत्रात आपले नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असत. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपले खरे पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे. अमोल कागणे हा तरुण निर्माता ‘बाबो’ या आगामी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवत असून हा मल्टीस्टार विनोदी चित्रपट 31 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी अमोलने विशेष मेहनत घेतली असून चित्रपटाच्या कथानकाची मागणी म्हणून अमोलने आपले 7 किलो वजन केवळ एका महिन्याभरात घटवले आहे.  

दर्जेदार कलाकृतींची निर्मिती करणारे अमोल कागणे सध्या अभिनयातले खाचखळगे जाणून घेत आहेत. त्यासाठी लागेल तेवढे कष्ट घेण्याची तयारी दाखवत अमोल 70 एमएमवर एक स्टायलिश हिरोच्या अंदाजात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. अलीकडेच लाँच झालेले ‘बाबो’मधील ‘म्याड रं’ हे गाणे तसेच टिझरमधून आपल्याला अमोल कागणे यांच्या अभिनयाची एक झलक पाहायला मिळतेय. 

‘म्याड रं’ या गाण्यातली अमोल कागणेंनी उडवून दिलेली धमाल सध्या सर्व म्युझिक चॅनेल्सवर पाहायला मिळतेय. मराठी मनोरंजन क्षेत्राला अमोल कागणेंच्या रुपाने एक प्रॉमिसिंग चेहरा नक्कीच भेटणार यात काही शंका नाही. 

 

Related posts: