|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » मनोरंजन » वैदेहीला चाहत्याकडून अनोखी भेट!

वैदेहीला चाहत्याकडून अनोखी भेट! 

प्रत्येक कलाकाराचा एक निराळा असा चाहता वर्ग असतो. चाहत्यांचे प्रेम कलाकारांना अधिक उत्तम काम करण्यासाठी नेहमीच प्रेरणा देत असते. ‘झी युवा’ वाहिनीवरील निरनिराळय़ा मालिकांमध्ये काम करणाऱया कलाकारांना चाहत्यांचे हे प्रेम अगदी भरभरून मिळते आहे. विशेषत: नुकतीच दोन वर्षे पूर्ण करणारी ‘फुलपाखरू’ ही मालिका याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. मालिकेबरोबरच मालिकेतील मुख्य जोडी, मानस आणि वैदेही यांचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. सोशल मीडियावरील अनेक पेजेस, ग्रुप्स यांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे या जोडीवर असलेले प्रेम वेळोवेळी दिसून येते. यशोमन आपटे आणि हृता दुर्गुळे ही जोडी प्रेक्षकांच्या गळय़ातील ताईत बनली आहे. त्यातही हृता दुर्गुळेचे चाहते तिच्या सौंदर्यावर व कामावर खूपच खुश आहेत. अनेक तरुणांसाठी ‘दिलाची धडकन’ असलेली हृता प्रेक्षकांचे प्रेम आणि जिव्हाळा यांचा पेंद्रबिंदू ठरली आहे. तिच्या अशाच एका चाहत्याने तिची एक छानशी तसवीर तिला भेट दिली आहे. उमेश पांचाळ या चित्रकाराने हृताचे हे हुबेहूब चित्र काढले आहे.

सोशल मीडियावर अनेक पेजेसमधून चाहता वर्ग आपले प्रेम व्यक्त करतो आहे. कलाकारांची ओळख, मालिकेतील पात्राच्या नावाने होऊन जाणे अशा घटना सुद्धा घडत असतात. पण चाहत्यांनी कलाकारावरील आपले प्रेम, आपुलकी याप्रकारे दर्शवण्याच्या घटना त्यांच्यासाठी कामाची मोठी पोचपावती ठरतात. हृता याचाच अनुभव सध्या घेत आहे.