|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘हाफ तिकीट’ चीनमध्ये प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट

‘हाफ तिकीट’ चीनमध्ये प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट 

लहानग्यांच्या भावविश्वाचा पॅनव्हास रेखाटणाऱया व्हिडिओ पॅलेस निर्मित व समित कक्कड दिग्दर्शित ‘हाफ तिकीट’ या मराठी चित्रपटाने अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव मोठय़ा दिमाखात कोरले. आता आणखी एक मानाचा तुरा ‘हाफ तिकीट’च्या शिरपेचात रोवला गेला आहे. ‘हाफ तिकीट’ लवकरच चीनमध्ये प्रदर्शित होईल. चीनमध्ये प्रदर्शित होणारा ‘हाफ तिकीट’ हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला हे विशेष. मराठी चित्रपटसफष्टीसाठी ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. हा चित्रपट मराठीतच पाहता येणार असून त्याला चिनी सबटायटल्सची जोड असेल.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता दाक्षिणात्य चित्रपट ‘काक मुत्ताई’चा मराठी रिमेक असलेल्या ‘हाफ तिकीट’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला असंख्य चित्रपट महोत्सवांमधून केवळ नावाजलेच गेले नाही तर अनेक पुरस्कारही मिळाले. दोन भावांच्या जिद्दीची त्यांच्या संघर्षाची ही गोष्ट क्षणिक भौतिक सुखांचा मागोवा घेते. शुभम मोरे, विनायक पोतदार या दोन बालकलाकारांच्या सहज-सुंदर अभिनयाला भाऊ कदम, प्रियांका बोस, उषा नाईक, शशांक शेंडे, जयवंत वाडकर, कैलाश वाघमारे आदी दिग्गज कलाकारांची उत्तम साथ लाभली आहे.