|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » मनोरंजन » इतिहासाची साक्ष देणाऱया त्यादिवशी सुरू झाले ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेचे शूटिंग

इतिहासाची साक्ष देणाऱया त्यादिवशी सुरू झाले ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेचे शूटिंग 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील महत्त्वाचा लढा म्हणजे महाडचा सत्याग्रह. रायगड जिल्हय़ातील महाड येथील चवदार तळय़ावर अस्पफश्यांना पाणी घेता यावे यासाठी बाबासाहेबांनी सत्याग्रह केला. हा लढा फक्त पाण्यापुरता मर्यादित नव्हता तर ती सुरुवात होती मानवी मुलभूत हक्कांच्या चळवळीची. या घटनेनंतर समतेचे वारे देशाच्या कानाकोपऱयातून वाहू लागले. 20 मार्च रोजी या घटनेला 92 वर्ष पूर्ण झाली. ‘स्टार प्रवाह’ वर 18 मे पासून म्हणजेच बुद्धपौर्णिमेपासून सुरू होणाऱया ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेच्या शूटिंगची सुरुवात याच ऐतिहासिक दिवशी म्हणजेच 20 मार्चला करण्यात आली. हा दिवस प्रत्येकाच्याच मनात कायमचा कोरला जाईल.