|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » Top News » मोबाईल फोनच्या बॅटरीचा स्फोट होऊन दोन मुले जखमी

मोबाईल फोनच्या बॅटरीचा स्फोट होऊन दोन मुले जखमी 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

मोबाईल फोनच्या बॅटरीचा स्फोट होऊन दोन मुले जखमी झाल्याची घटना औरंगाबादच्या शिऊरमध्ये घडली आहे. या स्फोटात दोन्ही बालकांच्या हाताला गंभीर इजा झाली असून त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कृष्णा रामेश्वर जाधव (वय 8 वर्ष) आणि कार्तिक रामेश्वर जाधव (वय 5 वर्ष) अशी या मुलांची नावं आहेत.

शिऊरमधील घोडके वस्तीत आज सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. कृष्णा आणि कार्तिक हे दोघे भाऊ मोबाईल फोनची बॅटरी बाहेर काढून तिच्यासोबत खेळत होते. मात्र त्याच वेळी बॅटरीचा स्फोट झाला. या स्फोटात दोन्ही भावंडांच्या हाताला गंभीर इजा झाली.

Related posts: