|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी जावयाला पेटवले

आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी जावयाला पेटवले 

ऑनलाईन टीम / अहमदनगर :

अहमदनगरमध्ये ’सैराट’ चित्रपटातील कथेची पुनरावृत्ती झाली आहे. आंतरजातीय विवाह केल्याने, मुलगी आणि जावयाच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून जावयावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पारनेर तालुक्यातील निघोज इथे ही घटना घडली. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी मुलीचे काका आणि मामा यांना अटक केली आहे, तर तिचे वडील फरार आहेत.