|Thursday, February 20, 2020
You are here: Home » leadingnews » लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले 

 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील सात राज्यामधील 51 जागांवर आज मतदान पार पडले आहे. या टप्प्यात यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह 674 उमेदवारांचं भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे.

पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील 14 जागा, राजस्थानमधील 12 जागा, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशमधील प्रत्येकी सात जागांवर, तर बिहारमधील पाच आणि झारखंडमधील चार जागांसाठी मतदान सुरु आहे. जम्मू-काश्मीरच्या लडाख आणि अनंतनाग जागेसाठी पुलवामा आणि शोपियां जिह्यात मतदान होत आहे. अमेठीच्या राणी आणि भाजप आमदार गरिमा सिंह यांनी मतदानाचा हक्क बजावला.

उत्तर प्रदेशातील 14 जागांवर दिग्गजांमध्ये टक्कर आहे, ज्यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा समावेश आहे.

अमेठी आणि रायबरेलीमध्ये सपा-बसपा गठबंधनने आपले उमेदवार उतरवले नाहीत. त्यांनी या दोन्ही जागा काँग्रेससाठी सोडल्या आहेत. राजनाथ सिंह लखनौमधून पुन्हा मैदानात आहेत तर अमेठीमध्ये स्मृती इराणींनी राहुल गांधींन आव्हान दिलं आहे.

राजस्थानमध्ये 12 लोकसभा जागावर ज्या 134 उमेदवारांचं भवितव्य निश्चित होणार आहे, त्यामध्ये दोन माजी ऑलिम्पिक खेळाडू, एक माजी आयएएस अधिकारी आणि एक माजी आयपीएस अधिकाऱ्याचा समावेश आहे. या टप्प्यानंतर राजस्थानमधील मतदान संपणार आहे. राजस्थानमध्ये राज्यवर्धन राठोड, कृष्णा पुनिया, अर्जुन राम मेघवाल प्रमुख उमेदवार आहेत. भारतीय संघाचा माजी कर्णधार क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी याने आपली पत्नी साक्षी धोनीसह आज झारखंडमध्ये मतदान केले. बिहारमधील छपरा येथे बूथ क्रमांक 131 वर ईव्हीएम तोडफोड केल्याच्या आरोपात रंजीत पासवान याला अटक करण्यात आली आहे.

कोणत्या राज्यात किती जागांवर मतदान :   उत्तर प्रदेश – 14, बिहार – 5, मध्य प्रदेश – 7, राजस्थान – 12, झारखंड – 4 , पश्चिम बंगाल- 7, जम्मू काश्मीर – 2

सायंकाळी पाच वाजेपर्यंत 7 राज्यातील मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

Related posts: