|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Automobiles » हुंदाई वेन्यूला लाँचआधी भरघोस प्रतिसाद

हुंदाई वेन्यूला लाँचआधी भरघोस प्रतिसाद 

 

ऑनलाईन टीम / मुंबई :  Hyundai कंपनीची Hyundai Venue ही नवीन कार 21 मे रोजी लाँच होणार आहे. सब-कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमधील ही कार देशातील पहिली मेड-इन-इंडिया कनेक्टेड कार ठरेल असा कंपनीचा दावा आहे. 2 मे पासून या सब-कॉम्पॅक्ट SUV साठी आगाऊ नोंदणी सुरू झाली असून ग्राहकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी या गाडीच्या 2 हजाराहून अधिक युनिट्सची बुकिंग झाली. दरतासाला या गाडीसाठी 84 बुकिंग येत असल्याचंही समजतंय. कंपनीच्या संकेतस्थळावर अथवा कंपनीच्या डिलर्सकडे 21 हजार रुपयांमध्ये या कारसाठी बुकिंग करता येणार आहे.

Hyundai Venue 33 नव्या फीचर्ससह पहिली मेड-इन इंडिया कनेक्टेड कार असेल, असा दावा कंपनीने केला आहे. 33 पैकी 10 फीचर केवळ भारतासाठी विकसित करण्यात आले आहेत. यातील काही आधुनिक फीचर्स केवळ BMW7 सारख्या कारमध्ये पहायला मिळतात. Hyundai Venue मधील 33 कनेक्टेड फीचर एखाद्या ऍप किंवा ह्युमन मशीन इंटरफेसद्वारे जोडले जातील. या कारमध्ये कंपनीने ‘ब्ल्यूलिंक’ कनेक्टिव्हिटी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.