|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गडहिंग्लजला शिवजयंती उत्साहात

गडहिंग्लजला शिवजयंती उत्साहात 

प्रतिनिधी/ गडहिंग्लज

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती गडहिंग्लजसह परिसरात ठिकठिकाणी मंगळवारी अमाप जल्लोषी वातावरणात साजरी करण्यात आली. शहरतील शिवाजी चौकातील शिवाजी पुतळय़ास आकर्षण विद्यूत रोषणाई केली होती. शहरात सकाळपासून विविध गड, किल्ल्यांवरून आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत करण्यात येत होते. शिवजयंतीनिमित्त शहरात †िठकठिकाणी भगवे झेंडे, पताके, डिजीटल फलक, शिवप्रतिमा पूजन व आतिषबाजी करण्यात आली होती. युगपुरूष शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी शहरात सकाळी तरुणांनी भगवे झेंडे घेवून दुचाकीवरून रॅली काढली होती. शहर शिवभक्तांमुळे फुलून गेले होते. तर सायंकाळी काढण्यात आलेली संघर्ष गुपची शिवमिरणूक लक्षवेधी ठरली.

गडहिंग्लजसह तालुक्यात विविध तरुण मंडळानी शिवजयंतीनिमित्त व्याख्याने, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन त्याचबरोबर राजा शिवछत्रपती मंडळाने सकाळी मिरवणुकीत झांजपथक, हलगी, लेझीम पथकांच्या सहभागाने ऊर्जा निर्माण केली. शिवसेनेच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर शिवाजी महाराजाच्या पुतळय़ाचे पूजन करून शिवजन्मकाळ सोहळा अमाप उत्साहात साजरा करण्यात आला. त्याचबरोबर महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले.

संपुर्ण शहरात दिवसभर विविध मंडळानी गड, किल्ल्यांवरून आणलेल्या शिवज्योतीचे पूजन करून मिरवणुका काढल्या. शाहिरी पोवाडे, भगवे झेंडे, पताका यांनी शहर भगवेमय झाले होते. संघर्ष गुपच्या वतीने सायंकाळी सात वाजता म. दु. श्रेष्ठी विद्यालयाजवळ आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली. यावेळी नगरसेविका सावित्री पाटील, नगरसेवक हारुण सय्यद, नगरसेविका रेश्मा कांबळे, शर्मिली मालंडकर, मंजुषा कदम, रामदास कुराडे, महेश सलवादे, नगरसेवक नरेंद्र भद्रापूर, कावेरी चौगुले, रामगोंडा पाटील, युवराज पाटील, किरणराव कदम, राजू जमादार, शिवराज पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते. मिरवणुकीत बैलजोडय़ा, घोडे, बेंजोच्या तालावर ‘जय भवानी जय शिवाजी’ चा अखंड जयघोष तरुणांना उर्जा देणारा होता. कलशधारी महिला, बैलगाडी, घोडे, डी. मेकर प्लॅशमॉब आणि मराठामोळा पोशाख परिधान केलेल्या तरुणी मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरल्या होत्या.

Related posts: