|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » …तर जूनअखेर 496 गावांना टँकरचे पाणी

…तर जूनअखेर 496 गावांना टँकरचे पाणी 

19 कोटी 15 लाखांच्या टंचाई कृती आराखडय़ास मान्यता

प्रतिनिधी/  सांगली

जिल्हय़ात दुष्काळाची दहाकता वाढत असून सध्या 174 गावे आणि एक हजारावर वाडय़ा-वस्त्यांना 180 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ही परिस्थिती आणखीच गंभीर होत असून पाऊस न पडल्यास जून अखेरपर्यंत 496 गावे आणि दोन हजार 605 वाडय़ावस्त्यांना 496 टँकरने पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे. यासाठी 19 कोटी 15 लाखांचा टंचाई कृती आराखडा तयार करून त्याला प्रशासनाने मान्यता दिली आहे.

  दुष्काळी समाधानकारक पाऊस पडला नसल्याने दुष्काळी तालुक्यातील गावांमध्ये सध्या चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. उन्हाची तीव्रता वाढतच चालल्याने दिवसेंदिवस या तालुक्यातील गावात टंचाईच्या झळा अधिकच तीव्र होत आहेत. गेल्या दोन महिन्यापासून दुष्काळी तालुक्यातील टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात येत असून  दिवसेंदिवस वाढत होत आहे. जिल्हय़ात डिसेंबरपासूनच पाणी टंचाई सुरू झाली आहे. या महिन्यात 41 गावांमध्ये 29 टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात होता. यामध्ये जानेवारीपासून दुपटीने वाढ झाली आहे. तर आणि मार्चमध्ये एप्रिलमध्ये संख्येत मोठी वाढ झाली आहे.

 सध्या मे महिना सुरू झाला असून  174 गावे आणि एक हजार 71 वाडयावस्त्यांना 180 टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये सर्वाधिक जत तालुक्यातील 86 गावे आणि 650 वाडय़ा, आटपाडी 26 गावे आणि 216 वाडया, कवठेमहांकाळ 19 आणि 96 वाडय़ा खानापूर 13 एक वाडी आणि तासगाव 22 गावे 92 आणि  मिरज आठ गावे 16 वाडय़ा अशा 173 गावे आणि 1071 वाडय़ावस्त्यांना  टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

             …तर जूनअखेर 496 गावांना टँकर

प्रशासनाने जूनपर्यंतचा 19 कोटी 15 लाखांचा टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये 496 गावे आणि दोन हजार 605 वाडय़ावस्त्यांना 496 टँकरने पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या आराखडय़ामध्ये विहीर अधिग्रण, 17 ठिकाणी नवीन विंधन विहीर घेणे आदी उपायोजना सुचविण्यात आल्या आहेत. दुष्काळात तलावातील गाळ काढण्याचे 113 प्रस्ताव आले आहेत. पैकी 76 प्रस्तावाला तातडीने मंजुरी दिली असून बाकीचे प्रस्तावही मंजुरी देण्यात आली आहे.

चारा छावण्या सुरू करण्याची मागणी

दुष्काळी तालुक्यातील गावांमध्ये प्रशासनाने टँकर सुरू केले आहे. यामुळे दुष्काळी जनतेला दिलासा मिळाला आहे. असे असले तरी सध्या मुक्या जनवारांच्या चाऱयाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लाखो जनवारांची चाऱयाविना उपासमारच सुरू आहे. यासाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली जात आहे. प्रशासनाने आत्तापर्यंत जिल्हय़ात आटपाडी तालुक्यात दोन छावण्या सुरू तर कवठेमहांकाळ तालुक्यात एक छावणी सुरू करण्यास मान्यता दिली आहे. मात्र जत, खानापूर, अद्याप छावण्या सुरू झाल्या नाहीत. छावण्याचे प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहेत. मात्र जाचक अटीमुळे याला मंजुरी दिली जात नाही. त्यामुळे या अटी शिथील करून तात्काळ छावण्या सुरू करावी, अशी दुष्काळी भागातून मागणी केली जात आहे.

Related posts: