|Friday, August 23, 2019
You are here: Home » उद्योग » तेल आयातीत 57 टक्क्यांनी घट

तेल आयातीत 57 टक्क्यांनी घट 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

इराणकडून भारतात आयात करण्यात आलेल्या तेलामध्ये वार्षिक आकडेवारीत घट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. एप्रिल-एप्रिल  या कालावधीत झालेल्या व्यापारादरम्यान आयातीत 57 टक्क्यांनी घट झाली आहे. कारण भारत हा ओपेक या तेल संघटनेचा सदस्य असून मागील वर्षभरात कच्या तेलाची आयात करण्यावर अमेरिकेकडून इराणवर निर्बंध लागू केले होते. त्याचाच काहीसा परिणाम हा तेल आयातीवर झाला असल्याचे पहावयास मिळाले आहे.

इराणकडून दिवसाकाठी भारत, अमेरिका आणि चीन या देशांना करण्यात येणाऱया बॅरेलच्या आयातीत कमी झाल्याची नोंद होत ती 277,600 बॅरेल प्रति दिन घट होत 31.5 टक्क्यावर आल्याचे पुरवठा व उपलब्ध आकडेवारीतून सांगण्यात आले आहे.

अमेरिकेकडून सादर करण्यात आलेल्या माहितीमधून मागील सहा महिन्यांच्या कालावधीत इराणकडून करण्यात आलेल्या आयातीच्या आकडेवारीत आठ राष्ट्रांसह भारतातील आयातीमध्ये एका समान पातळीवर स्थिती राहिल्याची नोंद करण्यात आली आहे. तर भारताने सरासरी 3 लाख बॅरेलची आयात केली आहे. परंतु प्रत्यक्षपणे नोव्हेबर-एप्रिलमध्ये करण्यात येणारी आयात घटत गेल्याची नोंद करण्यात आली आहे.

जानेवारी-एप्रिलमधील आयात

भारताने एकूण तेल आयातीमध्ये जानेवारी ते एप्रिल 2019 या काळात45 टक्क्यांनी घट होत 304,500 प्रति बॅरेलशी तुलना पाहिल्यास ती 552,000 प्रति बॅरेल राहिल्याची माहिती उपलब्ध आकडेवारीनुसार सांगण्यात आली आहे.