|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दागिने, रोख रक्कम मूळ मालकाला परत

दागिने, रोख रक्कम मूळ मालकाला परत 

प्रतिनिधी/ सिंधुदुर्गनगरी

कसाल येथील वाहतूक पोलीस केंद्राच्या पोलीस कर्मचाऱयांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाट येथे राजस्थान येथील नरेश राजपुरोहित यांची रात्री एक वाजता गहाळ झालेली रोख 20 हजार रक्कम व दागिने परत केले. ही घटना सोमवारी रात्री एक वाजता घडली.

खालापूर टोल नाका येथे विशेष अभियान असल्याने कसाल महामार्ग पोलीस विभागातील एकनाथ मुसळे, जयशंकर धुरी, सचिन करवंजे हे तीन पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी कार्यरत आहेत. दरम्यान, नरेश राजपुरोहित (रा. राजस्थान)  हे परिवारासह बंगलोर ते राजस्थान असे चारचाकी वाहनाने (जीए 05 डी 8705)  प्रवास करीत असताना ते बोरघाट येथे काही कामानिमित्त थांबले होते. त्यांनी पुन्हा पुढील प्रवासाला सुरुवात केली असता वाहनातून दागिने व रोख रक्कम 20 हजार रुपये असलेली पर्स एक्सप्रेस-वे वर पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबतची माहिती त्यांनी महामार्गावरील खालापूर टोल नाका येथे दिली. लागलीच सहाय्यक फौजदार जयशंकर धुरी व हेड कॉन्स्टेबल सुनील चौधरी, एकनाथ मुसळे व सचिन करवंजे यांनी ती पर्स (दागीन)s शोधण्यासाठी मोहीम राबविली असता त्यांना घाटात रात्री एक वाजता सदर पर्स (दागिने) व पैसे मिळाले. ही रक्कम व ऐवज नरेश राजपुरोहित यांच्या ताब्यात देण्यात आली. पोलिसांनी केलेल्या तत्पर मदतीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.