|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » बांद्यात खासगी बसला कारची धडक

बांद्यात खासगी बसला कारची धडक 

प्रतिनिधी / बांदा

मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा बसस्थानकानजीक खासगी बस अचानक वळविल्याने मागून येणाऱया कारने जोरदार धडक दिली. यात कारच्या दर्शनी भागाची मोठी हानी झाली. मात्र, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. हा अपघात बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास झाला. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत बांदा पोलिसांत नव्हती. 

बांद्याहून सावंतवाडीच्या दिशेने जाणारी खासगी आराम बस पुन्हा बांद्याच्या दिशेने येण्यासाठी येथील बसस्थानकानजीक असलेल्या सर्कलवर वळली. त्याचवेळी बांद्याहून इन्सुलीच्या दिशेने जाणाऱया वॅगनार कारची जोरदार धडक त्या बसला बसली. या धडकेत कारच्या दर्शनी भागाची मोठी हानी झाली. सुदैवानेच चालकाला दुखापत झाली नाही. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त कार बाजूला केली. दोन्ही चालकांनी प्रकरण तडजोडीने मिटविल्याचे सांगण्यात आले.