|Friday, August 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » राहुल गांधींकडून अखेर बिनशर्त माफी

राहुल गांधींकडून अखेर बिनशर्त माफी 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

‘चौकीदार चोर है’ ही वाक्मये न्यायालयाच्या तोंडी घातल्याप्रकरणी अखेर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली. राहुल गांधी यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात आणखी एक प्रतिज्ञापत्र सादर केले. यामध्ये आपण न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी बिनशर्त माफी मागत असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. तसेच याप्रकरणी भाजप नेत्या मिनाक्षी लेखी यांनी आपल्याविरुद्ध दाखल केलेला खटलाही रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ‘चौकीदार चोर है’ या घोषणेचा वापर केला होता. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. खंडपीठाने राहुल गांधींचे विधान चुकीचे असल्याचे सांगितल्यानंतर राहुल गांधी यांनी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र न्यायमूर्तींनी माफी मागण्याचे निर्देश दिल्यानंतर राहुल गांधी यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली. सर्वोच्च न्यायालयाविषयी आपल्या मनात सर्वोच्च प्रति÷ा आणि आदर असल्याचेही राहुल यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद करताना म्हटले आहे. त्यामुळे आता या वादावर पडदा पडला आहे. दरम्यान, राफेलप्रकरणी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. तत्पूर्वी घडलेली ही घडामोड महत्वाची मानली जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात सर्वोच्च्च न्यायालयाच्या या निकालाचा दाखला देताना राहुल गांधी यांनी न्यायालयानेच ‘चौकीदार चोर’ असल्याचे मान्य केल्याचे म्हटले होते. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर भाजपने आक्षेप घेतला होता. तसेच राहुल यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. राहुल गांधी यांनी आपण निवडणुकांच्या प्रचाराच्या गोंधळात हे वक्तव्य केले असल्याचे सांगत दोन वेळा चुकीबाबत खेद व्यक्त केला होता. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात राहुल यांनी आपल्याला केवळ पश्चाताप झाल्याचे म्हटले होते. या स्पष्टीकरणावर असमाधानी असलेल्या न्यायालयाने राहुल यांना पुन्हा प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी राहुल गांधींच्या वकिलांनी नवे प्रतिज्ञापत्र सादर करत बिनशर्त माफी मागितली.