|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दीड कोटी लोकांना सरकारने केले बेरोजगार

दीड कोटी लोकांना सरकारने केले बेरोजगार 

प्रतिनिधी /पणजी :

देशात जनतेने पूर्ण निर्धार केला आहे की आम्ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला हटवून राहुल गांधी यांना प्रधानमंत्री करणार. प्रधानमन्न हटावो या योजनेला लोकांचा चांगलाच प्रतिसाद सर्वत्र पाहायला मिळत आहे. मोदी यांची वेळ आता जवळ आली आहे. निवडणूक आयोग, पोलिस व इतर सरकारी यंत्रणे मोदी यांच्या हाताखाली वावरत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारही भाजपचेचे आहे पण खाण, जुगार या समस्या सोडविण्यात त्यांना यश आले नाही. दरवर्षी 2 काटी नोकऱया देणार असे मोदींनी सांगतिले होते पण या सरकारने लोकांचे व्यवसाय बंद करुन दीड कोटी लोकांना बेरोजगारे केल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय महीला कॉंग्रेस सरचिटणीस अप्सरा रेड्डी यांनी केले.

यावेळी पत्रकार परिषदेत गोवा प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष ऍड. प्रतिमा कुतिन्हो, सीमा फ्ढर्नांडिस व इतर कार्यकत्यांची उपस्थिती होती. गोव्यात उत्तरेत गिरीश चोडणकर आणि दक्षिणेतील फ्ढ्रान्सिस सार्दीन हे निवडून येणार हे नक्की. त्याचबरोबर आता पणजी पोटनिवडणुकीत बाबुश मोन्सेरात यांचा विजय निश्चित आहे. मोदी सरकार हे बलात्कार करणाऱयांना पाठींबा देत आहे तसेच ते पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांच्या नावाने मते मागत आहे. त्यांनी केलेली एकही योजना ही योग्यरित्या चालत नाही आहे. त्यामुळे त्यांच्याकडे मुद्देच नाही व म्हणूनच शहीदांच्या नावाने मते मागण्याची वेळ त्यांच्यावर आल्याचेही अप्सरा रेड्डी यांनी म्हटले.

ऍड. प्रतिमा कुतिन्हो यांनी सांगतिले की, यावेळी महिलांनी मोठय़ाप्रमाणात प्रचारात सहभाग घेतला. सर्व महिला घरातून बाहेर आल्या व काँग्रेसचा प्रचार केला कारण त्यांना मोदी सरकारचा प्रचंड संताप आहे. गोव्यात बालवयीन मुलीवर होणारा बलात्कार, भाजी महाग, फ्ढाŸर्मेलिनयुक्त मासे, पेट्रोल व डिझेल यांचे वाढणारे दर इ. अनेक घटनांचा या महिलांनी निषेध व्यक्त केला व मोठय़ा उत्साहात काँग्रेसला त्यांनी पाठींबा दिला आहे. बाबुश मोन्सेरात यावेळी निवडून येणार व ज्याप्रमाणे त्यांनी ताळगावचा विकास केला आहे त्याचप्रमाणे पणजीचाही विकास केला जाईल. पणजीत रोगजार ही मोठी समस्या असून आम्ही त्याला प्रथम प्राधान्य दिले आहे व नंतर विकासाचा मुद्दा ठेवला आहे.