|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » व्रतस्थ धोंडगणांना लागलीय लईराई देवीच्या दर्शनाची ओढ

व्रतस्थ धोंडगणांना लागलीय लईराई देवीच्या दर्शनाची ओढ 

वाळपई /प्रतिनिधी :

गुरुवारी गोवा राज्यातील मोठय़ा उत्साहाने साजरा होणाऱया शिरगाव येथील लईराई देवीचे व्रत करणाऱया व्रतस्थ धोंडांनी आज अनेक तळावर सत्यनारायण पूजा व वेगवेगळय़ा प्रकारचे सामाजिक उपक्रम हाती घेऊन लईराई देवीच्या यंदाच्या शेवटच्या दिनी वेगळय़ा प्रकारचे वातावरण निर्माण करण्यासाठी हातभार लावल्याचे चित्र सत्तरी तालुक्मयातील तळावर पहावयास मिळाले. लैराईदेवीचे  व्रत पाळणारे व्रतस्थ धोंड सत्तरी तालुक्मयांमध्ये अनेक तळावर पहावयास मिळत असून आज जवळपास सर्व स्थळावर सत्यनारायण महापूजा महाप्रसाद व वेगवेगळय़ा प्रकारचे सामाजिक विकासाच्या दृष्टिकोनातून कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये गावातील लोकांबरोबरच धोंड यांच्या कुटुंबीयांनी मोठय़ा संख्येने भाग घेतला होता.

 याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयांमध्ये लईराई देवीच्या व्रत पाळणारे हजारोच्या संख्येने धोंड आहेत. वेगवेगळय़ा ठिकाणी तळावर गेल्या आठ दिवसापासून व्रत करतांना पाहताना दिसत आहेत. यंदाच्या मोसमातील  पाळण्याचा शेवटचा दिवस असून अनेक तळावर लईयाई देवीच्या उत्साहाची आस लागलेली आहे. गुरुवारी संध्याकाळी  माता की जय अशा घोषणांनी अनेक  धोंड लईराई देवीच्या दर्शनासाठी जाणार असून यामध्ये सामील होण्यासाठी अनेकांना ऊर्जा निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

देवीच्या अंतरिक भक्तीने प्रभावित झालेले व्रतस्थ धोंड आज सत्यनारायण महापूजा व वेगवेगळय़ा उपक्रमाच्या माध्यमातून सक्रिय असल्याचे पाहावयास मिळाले.. जवळपास सत्तरी तालुक्मयातील सर्व स्थळावर आज सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे निसर्गाशी सलग्नीत असलेल्या तळावर धार्मिक स्वरूपाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक गावांमध्ये सामाजिक स्वरूपाचे उपक्रम राबवून शैक्षणिक स्तरावर मुलांचे गौरव व व सकारात्मक विचारांना प्रोत्साहन करणारी व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. आध्यात्मकि स्तरावर सुहास बुवा वझे यांनी अनेक तळावर नामजपाचा उपक्रम हाती घेऊन वेगळय़ाच प्रकारे हातभार लावण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये मोठय़ा संख्येने धोंड गणानी सहभाग दर्शविला होता.